Saturday, November 21, 2009
सानुचा ब्लॊग
बर्याच दिवसांपासून "आई मलाही तुझ्यासारखा ब्लॊग दे ना बनवून" असा लकडा मागे लागला होता. "बरं देऊया हं, या शनिवारी नकी," अशी टोलवा टोलविही बरीच झाल्यावर अखेर खनपटीला बसून हे मोठं काम झालंच. ब्लॊगमध्ये काय लिहिशिल या प्रश्नाला "पिक्चर" असं उत्तर देऊन, तयारी बरीच पुढची झालीय हे समजलं. ब्लॊग तयार करताना नाव काय द्यायचं हा मोठा प्रश्न "तोत्तोचान"नं सोडवला. एव्हाना गोष्टी सांगून सांगून तोत्तोचान मस्त मैत्रिण झालीय, काही झालं की तोत्तोचान असंच करायची का? हा प्रश्न हमखास असतो. या पुस्तकामुळेच जपानी लोक छोट्या मुलिच्या नावापुढे "चान" लावून तिला लाडाने हाक मारतात ही मौलिक माहिती मिळाली होतीच म्हणून ब्लॊगला नावही असंच लाडातलं द्यायचं ठरल्यावर घरातल्या लाडाच्या नावापुढे जपानी लाड चिकटून "सानुचान" झाली. ब्लॊगवर काय टाकायचं याचं पूर्ण स्वातंत्र्य तिला असल्यानं सध्या ती यासंदर्भातली यादी बनवते आहे. त्यामुळे चित्रांच्या जोडीनं आगामी काळात आणखिही काय काय बघायला मिळेल. असो. सध्या इतकंच.
Subscribe to:
Posts (Atom)