माजे नाव सनुचान उर्फ तुमची सनु. कधी न्हावे तेव्हा माला माझ्या ब्लोग ची आठवण आलिच… शेवटी काय आहे न कि माझ्या आई ने हा ब्लोग लाडाने फक्त माझ्या करता बनवला आहे…पण मग मी आत्ता का लिह्तीये? कारण बाबा आता एवढा काळ झाला लिहून कारण तेव्हा मी छोट्टीशी होते ना मग मला काय कळणार ब्लोग काय अन वेब काय ते. पण मल्ल लिहायची आज इच्छा झाली?
काल मी बेड वर बसून मस्त पेकी एक गोड आंबा खात होते. तेव्हा आईच्या मोबाईल वर आठवणींचे पिंपळपान असा पेज ओपन होता. सहज बघण्या साठी तो मोबाईल घेऊन पहिला. तर तेव्हा माला आठवलं कि अर्रेच्चा हा तर आईचा ब्लोग आहे! वाचता वाचता एका अश्या पोस्त वर पोचले जिथं माझ्या पहिल्या दात पडण्याची गोष्ट लिहिली होति. आणि मग माल वाटलं कि हो रे माझा पण एक ब्लोग आहे सानुचान म्हणून.
मग माल विचार मनात आला कि आता मी मोठी झाली आहे तर आपण पण लिहूया कि ब्लोग तसाही आत्ताच सहाव्वी संपलेली आहे आणि परीक्षा संपणार आहेचाच मग या सुट्टीत मस्त पेकी ब्लोग लिहायला चालू करूया कि! मज्जा पण आणि नवीन नवीन शिकायला हि मेळता.
तर मित्रांनो मी ठरवलंय कि मी ब्लोग लिहिणार! काही झालं तरी पन.
0 comments:
Post a Comment