Feeds RSS
Feeds RSS

Tuesday, March 31, 2015

         माजे नाव सनुचान उर्फ तुमची सनु. कधी न्हावे तेव्हा माला माझ्या  ब्लोग ची आठवण आलिच… शेवटी काय आहे न कि माझ्या आई ने हा ब्लोग लाडाने फक्त माझ्या करता बनवला आहे…पण मग मी आत्ता का लिह्तीये? कारण बाबा आता एवढा काळ  झाला लिहून कारण तेव्हा मी छोट्टीशी होते ना मग मला काय कळणार ब्लोग काय अन वेब काय ते. पण मल्ल लिहायची आज इच्छा झाली? 
         काल मी बेड वर बसून मस्त पेकी एक गोड आंबा खात होते. तेव्हा आईच्या मोबाईल वर आठवणींचे पिंपळपान असा पेज ओपन होता. सहज बघण्या साठी तो मोबाईल घेऊन पहिला. तर तेव्हा माला आठवलं कि अर्रेच्चा हा तर आईचा ब्लोग आहे! वाचता वाचता एका अश्या पोस्त  वर पोचले जिथं माझ्या पहिल्या दात पडण्याची गोष्ट लिहिली होति. आणि मग माल वाटलं कि हो रे माझा पण एक ब्लोग आहे सानुचान म्हणून. 
मग माल विचार मनात आला कि आता मी मोठी झाली आहे तर आपण पण लिहूया कि ब्लोग तसाही आत्ताच सहाव्वी संपलेली आहे आणि परीक्षा संपणार आहेचाच मग या सुट्टीत मस्त पेकी ब्लोग लिहायला चालू करूया कि! मज्जा पण आणि नवीन नवीन शिकायला हि मेळता. 
          तर मित्रांनो मी ठरवलंय कि मी ब्लोग लिहिणार! काही झालं तरी पन. 


Saturday, November 21, 2009

सानुचा ब्लॊग

बर्याच दिवसांपासून "आई मलाही तुझ्यासारखा ब्लॊग दे ना बनवून" असा लकडा मागे लागला होता. "बरं देऊया हं, या शनिवारी नकी," अशी टोलवा टोलविही बरीच झाल्यावर अखेर खनपटीला बसून हे मोठं काम झालंच. ब्लॊगमध्ये काय लिहिशिल या प्रश्नाला "पिक्चर" असं उत्तर देऊन, तयारी बरीच पुढची झालीय हे समजलं. ब्लॊग तयार करताना नाव काय द्यायचं हा मोठा प्रश्न "तोत्तोचान"नं सोडवला. एव्हाना गोष्टी सांगून सांगून तोत्तोचान मस्त मैत्रिण झालीय, काही झालं की तोत्तोचान असंच करायची का? हा प्रश्न हमखास असतो. या पुस्तकामुळेच जपानी लोक छोट्या मुलिच्या नावापुढे "चान" लावून तिला लाडाने हाक मारतात ही मौलिक माहिती मिळाली होतीच म्हणून ब्लॊगला नावही असंच लाडातलं द्यायचं ठरल्यावर घरातल्या लाडाच्या नावापुढे जपानी लाड चिकटून "सानुचान" झाली. ब्लॊगवर काय टाकायचं याचं पूर्ण स्वातंत्र्य तिला असल्यानं सध्या ती यासंदर्भातली यादी बनवते आहे. त्यामुळे चित्रांच्या जोडीनं आगामी काळात आणखिही काय काय बघायला मिळेल. असो. सध्या इतकंच.

hallo

hi, everybody. i am saniya. i draw this picture for my teacher.